सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वणी येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ व कृषी विभाग यांच्या संयुक्त विघमाने १५ डिसेंबर २०२३ रोजी घेतलेल्या "वखार आपल्या दारी" या जिल्हास्तरीय कार्यशाळेत वणी तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, महिला बचत गट, महिला बचत गटांचे फेडरेशन सहकारी संस्था, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांना कार्यशाळेत आमंत्रित करण्यात आले होते.
यांनी उपस्थित राहून गोदाम उभारणी, गोदाम व्यवस्थापन तंत्रज्ञान, गोदाम विषयक शासनाच्या विविध योजना, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम पावती विषयक योजना याबाबतचे मार्गदर्शन केले. व या कार्यक्रमात शेतमाल तारण कर्ज योजना या विषयावर विस्तृत माहिती देऊन शेतकऱ्यांनी या तारण योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी मोठ्या संख्येने सर्व शेतकरी शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, महिला बचत गट, महिला बचत गटाचे फेडरेशन, सरकारी संस्था, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व श्री. दीपक बेदरकर विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, श्री. आनंद बद्दल मंडळ अधिकारी, श्री. संजय खाडे अध्यक्ष रंगनाथस्वामी फार्मर्स प्रा. कंपनी वणी तथा संचालक वसंत जिनिंग वणी, श्री. जयसिंग गोहोकार माजी सभापती पं. स. वणी, श्री. पुरुषोत्तम आवारी संचालक वसंत जिनिंग वणी, श्री स्वप्निल बागडे, केंद्र प्रमुख महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वणी, मोनाली शेंडे महिला आर्थिक विकास महामंडळ आदी उपस्थित होते.