टॉप बातम्या

कुंभा येथे गोंड गोवारी जमात प्रबोधन मेळावा


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे

मारेगाव : आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती महाराष्ट्र च्या वतीने मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे भव्य आदिवासी गोंड गोवारी जमात प्रबोधन मेळाव्याचे आयोजन दिनांक १७ डिसेंबर रोज शनिवारला दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष माधव कोहळे करणार आहे तर अध्यक्षस्थानी झेड.आर.दुधकुवर भंडारा हे राहतील. 
या मेळाव्यात १८ डिसेंबर २०२० रोजीच्या सर्वोच्च न्यायालयातील रिट पिटिशन क्रमांक ४०९६/२०२० मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात सोनेगाव येथे १९६१ ला झालेल्या सर्वेक्षण नुसार नेहारे, नागोसे, राऊत अशा विविध आडनावाच्या गोंड गोवारी लोकांना आदिवासीचे आरक्षण दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात गोंड गोवारी जमात बांधवांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाण कसे प्राप्त करायचे याबाबत विस्तृत विचारमंथन केले जाईल.
       
मेळाव्याला गजानन कोहळे, विलास राउत, प्रा.पञू नागोसे, युवराज नेवारे, राजाभाऊ ठाकरे, चंद्रशेखर ठाकरे, अमोल गुरनुले, राजुभाऊ मांदाडे, संजय चचाने, जे.एम.ठाकरे, मारोती मुरके, चिंतामण दुधकोहळे, सरपंच अरविंद ठाकरे, रामचंद्र मेश्राम, महादेव नेहारे, दादाराव बोटरे, जिल्हाध्यक्ष विकास लसंते, प्रशांत लसंते इत्यादी प्रमुख मार्गदर्शक हजर राहणार आहेत.
या होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधवांनी हजर राहावे असे आवाहन शञूघ्न ठाकरे,पुंडलिक फुन्ने,सुभाष लसंते,सतीश दुधकोहळे,पवन राऊत,निलेश चौधरी,प्रविण राऊत,गजानन गाते,पंकज नेहारे,धनराज खंडरे,सुनिल वाघाडे,कैलास वाघाडे,गजानन ठाकरे,अंकुश नेहारे,उमेश नेहारे,किसन खंडरे,प्रफुल राउत,विनोद ठाकरे,संदिप राउत,मारोती सरवर,किसन कोहळे,निलेश परसराम,मारोती राऊत,आशा कोहळे,रेखा नागोसे,वैशाली राऊत,पंचफुला ठाकरे यांनी केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();