टॉप बातम्या

राज्य मार्गांवरील खडकी फाट्यानजीक अपघात; एक ठार तर एक जखमी

 
सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : आज गुरूवार ला संध्याकाळी राज्य महामार्गावरील खडकी फाट्याजवळ करंजी वरून येणाऱ्या दुचाकीने उभ्या ट्रकला धडक दिल्याने दुचाकीस्वार चालक जागीच ठार तर मृतकाचा सख्खा चुलत भाऊ गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली.

हरिदास लक्ष्मण टेकाम (वय 30) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे, तर गंभीररीत्या जखमी झालेले रामकिसन टेकाम (सालईपोड) याचा समावेश आहे.

हे दोघेही सख्खे चुलत भाऊ स्व:गावरून मारेगाव कडे दुचाकीने येत असताना राज्य महामार्गावर उभा असलेल्या ट्रक'ला मागावून धडक दिली. यात हरिदास हा जागीच ठार झाला तर, मृतकाचा चुलत भाऊ किसन हा गंभीररीत्या जखमी झाला.

मारेगाव येथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्याच्या हालचाली'ला वेग आला होता.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();