टॉप बातम्या

जनआयोग विदर्भ पुर व अतिवृष्टी २०२१ ची वणी येथे जनसुनावणी संपन्न


सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील विशेषतः वणी,मारेगाव,झरी भागातील पुरपरीस्थीती हि निव्वळ नैसर्गिक नसुन मानव निर्मित असल्याचे सिद्ध झाले. पुरग्रस्तांच्या समस्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य किसान सभेने डाॅ.श्रिनीवास खांदेवाले यांचे अध्यक्षतेखाली दहा तज्ञ सदस्यीय जनआयोग स्थापन केला. हा आयोग विदर्भातील प्रत्येक पुरग्रस्त भागाचा दौरा करुन जनसुनावणी घेत आहेत.
सर्वोच्च समस्यांची नोंद घेऊन अहवाल विधानसभेत सरकारला सादर करणार आहे. त्याच अनुषंगाने वणी येथे दि.11/12/22 ला हि सुनावणी घेण्यासाठी आयोग आला होता.आयोगाचे सदस्य डाॅ.महेश कोपुलवार,डाॅ.कौस्तुब पंढरीपांडे (पयाॆवरणतज्ञ), डाॅ.अनिल राजनकर (वनस्पती शास्त्रज्ञ) यांनी संपूर्ण कामकाज करुन शेकडो पुरग्रस्त शेतकरयांच्या व्यथा ऐकल्या,निवेदने घेतली.
या जनसुनावणी मध्ये पुरग्रस्त गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी, नागरीकांनी शेकडोच्या संख्येने सहभाग घेतला. वसंत जिनींग सभागृहात संपन्न आयोगाच्या व्यवस्थापनासाठी काॅ.अनिल हेपट, कॉ.अनिल घाटे, कॉ सुनिल गेडाम, प्रा.करमसिंग राजपूत, बंडु गोलर, प्रविण रोगे, गौरव जवादे, नितीन तुराणकर, मोतिलाल चिरखारे, अक्षय रामटेके आदींनी मेहनत घेतली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();