टॉप बातम्या

कोतवालांचा आंदोलनाचा ईशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : म. रा. कोतवाल संघटने तर्फे विविध मागण्या संबंधीचे निवेदन विभागीय आयुक्त नागपूर यांना नुकतेच देण्यात आले. २५ डिसेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २६ डिसेंबर ला नागपूर येथील अधिवेशनावर मोर्चा व त्याच ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

विभागीय आयुकतांना दिलेल्या निवेदनात कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा, दर्जा मिळेपर्यंत सरसकट २५ हजार रु वेतन देण्यात यावे, सेवानिवृत्तीनंतर १० हजार रुपये पेन्शन देण्यात यावे, शिपाई संवर्गातील आरक्षण चाळीस टक्क्यावरून शंभर टक्के करण्यात यावे, तलाठी पदाकारिता २५ टक्के आरक्षण मिळावे तसेच पदोन्नती साठीची असलेली ४५ वर्ष वयाची अट कायम स्वरूपी रद्द करण्यात यावी.
या सर्व मागण्या २५ डिसेंबर पर्यंत मान्य न झाल्यास २६ डिसेंबर पासून नागपूर येथील अधिवेशनात राज्यातील हजारो कोतवाल मागण्या मंजूर होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करतील असा इशारा विभागीय आयुकतांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
    
प्रचंड महागाईच्या तप्त झळा सोसतांना भल्या भल्याची तारांबळ उडतांना दिसत असतांना कोतवाल सारख्या २४ तास सेवा देणाऱ्या महसूल विभागातील महत्वाच्या घटकाला  सात हजार पाचशे रुपये महिन्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर कुटुंब चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे आज ता.१३ डिसेंबर २०२२ ला म. रा. कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी द्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
    
यावेळी जिल्लाध्यक्ष शशिकांत निमसटकर, महिला जिल्लाध्यक्ष छायाताई दरोडे, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, मुख मार्गदर्शक दिलीप इंगोले, प्रसिद्धी प्रमुख अशोक शिंदे, जिल्हा खजिनदार अक्षय बावणे, प्रशांत प्रभाते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();