सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके
नागभिड : नागभीड - ब्रम्हपुरी महामार्गावरील कोर्धा गावासमोरील पांजरेपार फाट्याजवळ शैलेश जीवतोडे यांच्या शेतात भला मोठा अजगर साप असल्याची माहिती जिल्हापरिषद चे माजी सदस्य संजय गजपुरे यांनी झेप संस्थेच्या सर्पमित्रांना दिली. माहिती मिळताच झेप चे अध्यक्ष डॉ.पवन नागरे,उपाध्यक्ष अमोल वानखेडे,सचिव अमितजी देशमुख , समीर भोयर,गुलाब राऊत,क्षितिज गरमडे, रितेश कोरे,जितू श्यामकुळे ,अक्षय जीवतोडे,प्रीतम रगडे,निखिल देशमुख यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली . कोर्धा इथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला शेतामध्ये हा भलामोठा अजगर जातीचा साप दृष्यास आले . तो भारतीय अजगर असल्याचे कळले . यावेळी घटनास्थळी पाचशे हुन अधिक बघ्यांची गर्दी झाली होती.आज १२.३० वाजता चे दरम्यान या अजगरला सुखरूप पकडून त्याला नागभीड वनविभाग कार्यालयात आणले. त्याचे वनविभाग नागभीड इथे पंचनामा केले. त्याची लांबी 12 फूट असून वजन 24 किलो नोंद करण्यात आली. अजगराची माहिती मिळताच स्थानिक विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी वनविभाग कार्यालयात शिक्षकांसहीत प्रत्यक्ष माहिती घेतली. नंतर त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला घोडाझरी जंगलात त्याच्या अधिवासात झेप च्या सर्पमित्रांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडून दिले.