सह्याद्री चौफेर | नितेश वनकर
मारेगाव : वनोजा गावात घाणीचे साम्राज्य असून या घाणीमुळे आरोग्य धोक्यात आले आल्याचे चित्र दिसत आहे. वनोजा ग्रामपंचायतीला जाग येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारेगाव तालुक्यातील वनोजा गावात घाणीजे साम्राज्य कायम असून त्यात भर पडली ती म्हणजे पिण्याचे हातपंपच्या सभोवताल सांडपाण्याचा विळखा घातला. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या १ वर्षांपासून ही हप्सी घाणीच्या विळख्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे अनेक गल्या चिखलमय असून गावातील मुख्य मार्गांवर सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना रहदारीकरिता तारेवरची कसरत करावी लागत असून ग्रामपंचायत मात्र आपल्याच धुंदीत मग्न आहे.ग्रामपंचायत कुंभकर्ण झोपेत असल्याने गावातील रहिवाशी्यांचे अडचणीत घट न होता अधिकाधिक वाढ होत आहे.
वनोजा गावातील सध्याची परिस्थिती एवढी विदारक आहे की वार्ड नंबर 3 मधील पिण्याचे हातपंप सांडपाणी व घाणीच्या विळख्यात आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसून नागरिकांना अशा एक ना अनेक समेस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यात मुख्य म्हणजे पिण्याच्या पाण्याची हातपंप घाणीच्या विळख्यात आलेला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे येथील नागरिकांची ओरड आहे.