टॉप बातम्या

जागृती विचार मंचाचे पोलीस प्रशासनास निवेदन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : सध्याची गर्दा पाहता वाहने शहरात कुठेही उभी असतांना दिसतात. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असून अपघातासही निमंत्रण देत आहे. तसेच मारेगावात रोड रोमियोची भरधाव दुचाकी हाकलने एखाद्याचा 'रामनाम' करेल याची शक्यता वर्तविली जात असल्याने यावर नियंत्रण आणण्याबाबत जागृती विचार मंच'च्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांना निवेदन देतांना जागृती विचार मंचचे अध्यक्ष जितेंद्र नगराळे, सचिव अ‍ॅड..महेमुद खान, खालीद पटेल, उदय रायपूरे, दीपक डोहणे, राजू मोरे, अभय चौधरी, करण किंगरे, विप्लव ताकसांडे, प्रशांत नांदे, कैलास ठेंगणे, आकाश बदकी, इकबाल सय्यद, पंकज नेहारे, जुनेद पटेल, बदरुद्दीन सय्यद, शाहरुख, लाभेष खाडे, चांद बहादे, सुरज वाढई आदींची उपस्थिती होती.

निवेदनात पुढे  शहरातील दुतर्फा वाहतुकीने रस्त्यासह पादचाऱ्यांची प्रचंड हेळसांड होते आहे. वाहन धारक ऐन रस्त्यावर मोटारसायकल ठेवून रस्त्यावर येजा करणाऱ्यास मनस्ताप सहन करावा लागत आहे. अठरा वर्षाआतील रोड रोमियोंची भरधाव दुचाकी चालविण्याचे प्रमाण मोठ्या वाढत असून भरधाव चालविणाऱ्या वाहनाने अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नियंत्रित करण्याची गरज असून यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवावी अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा गर्भित ईशारा जागृती विचार मंच ने आज मंगळवार दि.१३ डिसेंबर रोजी पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनातून दिला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();