विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन.....

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : स्थानिक विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक २८,२९ आणि ३० डिसेंबर २०२२ ला वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी कोणते ना कोणते सुप्त गुण दडलेले असतात त्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकास होण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय संदीप भाऊ गड्डमवार अध्यक्ष, भारत शिक्षण प्रसारक मंडळ ,सावली यांचे हस्ते होणार आहे.
        
सदर वार्षिक स्नेहसंमेलनात बौद्धिक कार्यक्रमांमध्ये वादविवाद स्पर्धा, बचाव स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा व अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन केले आहे. तर मैदानी खेळामध्ये कबड्डी स्पर्धा,गोळा फेक, रनिंग स्पर्धेचे आयोजन केले केले आहे तसेच सायबर क्राईम आणि पॉस्को ॲक्ट या विषयावर सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय आशिषजी बोरकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
   तरी होणाऱ्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र मुप्पावार सर यांनी केले आहे.
विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन..... विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन..... Reviewed by सह्याद्री चौफेर on December 26, 2022 Rating: 5
Powered by Blogger.