सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : प्रतिष्ठेची समजली जाणारी मार्डी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया आज शांततेच्या वातावरणात पार पडली. गावाची एकूण स्त्री-पुरुष मतदार संख्या १५३६ असून त्यापैकी १२४४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८०.९८ % अशी आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक १ मध्ये ३३६, प्रभाग क्रमांक २ मध्ये ४५० तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये ४५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने त्या पदाकरिता एकूण ५ उमेदवार रिंगणात उभे असून आणि २१ उमेदवार सदस्य पदाकरिता उभे होते. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत मतदारांनी आपापल्या वेळेनुसार येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

