टॉप बातम्या

ग्रामपंचायत बोथली निवडणुकीत उमाबाई कोरडे ठरली सर्वात ज्येष्ठ मतदार...


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : प्रतिष्ठेची समजली जाणारी बोथली ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया आज शांततेच्या वातावरणात पार पडली. गावाची एकूण स्त्री-पुरुष मतदार संख्या १७११ असून त्यापैकी १४१९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८२.९३ % अशी आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक १ मध्ये ४७३, प्रभाग क्रमांक २ मध्ये ४२१ तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने त्या पदाकरिता एकूण ६ उमेदवार रिंगणात उभे असून आणि २८ उमेदवार सदस्य पदाकरिता उभे होते.

अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत १०४ वर्षाच्या उमाबाई विठल कोरडे या सर्वात ज्येष्ठ मतदार ठरल्या. १०४ वर्षांच्या उमाबाई कोरडे यांनी तरुणाईला लाजवेल अशा थाटात येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
झालेल्या एकुण मतदानाचे आपल्याला किती मत आणि विरोधी पक्षाच्या उमेदवाराला किती मत याचे गणितीय आकडेमोड करण्याला सुरुवात केली आहे. येत्या २० तारखेला मतमोजणी होणार आहे, तत्पूर्वी सर्व उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();