टॉप बातम्या

ग्राम रोजगार सेवकाच्या समस्या सोडविण्याची मागणी; हिवाळी अधिवेशनात मागण्या पूर्ण करा, मंत्री संजय राठोड यांच्याकडे मागणी


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकाच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात पूर्ण करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.संजय राठोड यांच्याकडे रोजगार सेवक संघटनेने भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. ग्राम रोजगार सेवक संघटना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्या हिवाळी अधिवेसनात पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे.

सन २००६ पासून म.रो.ह.यो.सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये ग्राम रोजगार सेवक यांची नियुक्ती करण्यात आली तेंव्हापासून ग्रामीण भागात रोहयोच्या कामात ग्राम रोजगार सेवकांची महत्वाची भूमिका पार पाडत आहे. प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागात मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. २००६ पासून आज पर्यंत ग्राम रोजगार सेवकांना टक्केवारीत आपला घर संसार सांभाळून उदरनिर्वाह करावा लागत आहे. मागील सरकार मध्ये यासंदर्भात वेळोवेळी निवेदन,मोर्चा तसेच विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. रो.ह.यो मंत्री व कैबिनेटमंत्री व राज्यमंत्री यांना मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. मात्र आज पर्यंत शासन दरबारीं मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाही.

हिवाळी अधिवेशनात ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी मंत्री संजय राठोड यांच्याकडे ग्राम रोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद आडे, भावराव आडे, हरिद्वार जाधव, नामदेव तायडे, माणिक राठोड, राजू राठोड व ग्राम रोजगारसेवकांनी केली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();