सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : येथील जयस्वाल मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल वणीच्या वतीने वाहन चालक प्रशिक्षणासाठी परिवहन विभाग यवतमाळ यांचे कडून मान्यता प्राप्त आकाराचे इंग्रजी अक्षर एच व सी तसेच इंग्रजी अंक आठ ड्रायव्हिंग प्रशिक्षण ट्रॅकची निर्मिती चोरडिया यांच्या भुखंडावर करण्यात आली.
या प्रशिक्षण ट्रॅकचे उद्घाटन 17 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता वाहतूक शाखेचे सपोनि संजय आत्राम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीचे अध्यक्ष विजयबाबू चोरडिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणुन शासकीय आय.टी.आय.चे सेवानिवृत्त मॅक्यानिकल मोटर व्हिकल इन्ट्रक्टर गोविंद थेरे सर व पोलीस भरती करीता अनेक वर्षांपासून युवक युवती यांना निस्वार्थ शासकीय मैदानावर प्रशिक्षण देणारे दिलीप मालेकर सर हे उपस्थित होते.
जयस्वाल मोटर ड्रायव्हिंग स्कूल तर्फे सदर ट्रॅकवर पोलिस विभागात चालक पदासाठी अर्ज केलेल्या सर्व युवक युवतींना जयस्वाल मोटर ड्रायव्हिंग स्कूल तर्फे निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे आयोजकाच्या वतीने सांगण्यात येत आहे. गोविंद थेरे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना अपघात विरहित वाहन चालविण्याबाबत मोटर वाहन कायदा, व रस्ता सुरक्षा बाबत संयम ठेवण्याचे मार्गदर्शन केले. दिलीप मालेकर यांनी प्रशिक्षण आत्मसात करण्याकरिता प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहीत करतांना कठोर परिश्रम घेण्यास मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय चोरडिया यांनी मार्गदर्शन करताना प्रशिक्षणार्थींना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व वाहन प्रशिक्षणासाठी स्वताच्या मालकीचे एक वाहन निःशुल्क उपलब्ध करून दिले. उद्धघाटक वाहतूक शाखेचे सपोनि संजय आत्राम यांनी प्रशिक्षणार्थींना स्पर्धा परीक्षांचा अभ्यासावर व मैदानी सरावाबाबत मोलाचे मार्गदर्शन करताना वाहतूक नियम व अपघात विरहित वाहन चालन बाबत मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षा अभ्यासाकरीता पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी ते बोलतांना म्हणाले की, मिळालेल्या संधीचं सोने करायला शिका तेव्हाच तुम्हाला यश प्राप्त होईल..!
या कार्यक्रमाचे संचालन अंकुश जयस्वाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयस्वाल मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक संतोष जयस्वाल यांनी करून प्रशिक्षण ट्रॅक निर्मिती करीता मान्यता प्राप्त तांत्रिक माहिती उपलब्ध करून देणारे सोपान ढोले, अमरावती,व मकसुद खान (गोंदिया) यांचे विशेष आभार मानले. या प्रशिक्षण ट्रॅकचे यशस्वीतेसाठी दिलीप मालेकर, देवानंद दुबे, राहुल धांडे, दामु उईके यासह प्रशिक्षणार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.