टॉप बातम्या

अखेर पाचव्या दिवशी "त्या" महिलेच्या उपोषणाची सांगता...

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

राळेगाव : यवतमाळ जिल्हा निसर्गप्रकोप आणि मानवनिर्मित संकटामुळे सतत चर्चेत राहिला आहे. सरत्या वर्षात निसर्ग प्रकोपामुळे शेतकऱ्यांसह मजूरदार यांची वाट लागली. या परिस्थितीतून सावरण्यासाठी बँक मदतीला येईल, असा विश्वास महिलेला होता. मात्र, बँकेने तकलादू धोरण राबवित महिलेची पार निराशा केली. मंजूर झालेले कर्ज मिळत नसल्याने अखेर महिलेला आमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागले.
राळेगाव तालुक्यातील सेंट्रल बँक शाखा वडकी समोर कर्ज मिळण्यासाठी येथील श्रीमती गंगा रामदास कुमरे ही महिला दि 12 डिसेंबर रोजी आमरण उपोषणाला बसली होती. या उपोषण दरम्यान, अनेक नेते मंडळींनी भेट दिली असता राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष (अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषद) यांनी सुद्धा सदर महिलेची भेट घेवून आपला पाठिंबा दर्शवीला होता.

अखेर पाचव्या दिवशी सेंट्रल बँक लिड,जिल्हा व्यवस्थापक अमर गजभिये यवतमाळ, सि एच गुडमे,डी आय सी. उद्योग भवन यवतमाळ, नायब तहसीलदार दिलीप बदकी,वडकी सेंट्रल बँक व्यवस्थापक चंद्रशेखर कारेकर, वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनायक जाधव, वडकी मंडळ अधिकारी बाबाराव पोटे, तलाठी गिरीश खडसे, तलाठी अविना पाटील यांनी उपोषणकर्त्या महिलेशी सकारात्मक भूमिका घेवून महिलेला योग्य तोडगा काढुन एक महिन्याच्या आत एक लाख रुपया पर्यंत कर्ज मंजूर करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
त्यानंतर उपोषणास बसलेल्या महिलेला निंबू शरबत पाजून आमरण उपोषण सोडण्यात आले. यावेळी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();