टॉप बातम्या

मारेगांव तालुक्यात आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना;वनोजादेवी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची पुन्हा आत्महत्या.


सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : मारेगांव तालुक्यातील वनोजा देवी येथील शेतकरी अधिकराव कृष्णराव घोरुडे वय 60 वर्ष यांनी रविवार दि.18 डिसेंबर ला कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. निसर्गाच्या लहरीपणामुळे गरजा भागवण्यापुरते तरी उत्पन्न होईल की नाही, किंबहुना होणारच नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह व घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी ह्या विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे.       
अधिकरावांनी शेतीसाठी बँकेचे तसेच खाजगी कर्ज घेऊन शेती केली, मात्र निसर्गाच्या प्रकोपाने शेतीचे नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड करण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. ह्या विवंचनेतूनच त्यांनी काल रविवार ला सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान, शेतात विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक मुलगी, नातवंड व आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शासनाच्या तकलादू धोरणाने मारेगांव तालुक्यात अजून किती आत्महत्या होणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
प्रा नितेश कराळे सर वर्धा 



Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();