सह्याद्री चौफेर |रूस्तम शेख
कळंब : आपले मानवाधिकार फाउंडेशन च्या वतीने आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देण्यात येतो... या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील वैद्यकीय व वनौषधी क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. विवेक चौधरी यांना आपलें मानवधिकार आरोग्यदूत भूषण २०२२ पुरस्कार जाहीर झाला.
डॉ. विवेक चौधरी हे विशेषत वनौषधी, निसर्गोपचार,आयुर्वेद क्षेत्रात काम करत असून लुप्त होणाऱ्या जंगली वनस्पती यांची जनतेमध्ये ओळख होऊन आरोग्याबाबतीत यांचे कसे महत्व आहे यांची जनजागृती करून ग्रामीण भागात जनतेचे आरोग्य, रोजगार कसे प्राप्त होईल, कोरोना महामारीत आयुष विभागामार्फत निर्देशांनुसार शेकडो लोकांना वनौषधी,क्रिया यांच्या चिकित्सा केल्या गेल्या तसेच शेकडो लोकांना अन्न वाटप व घरगुती रोजगार प्राप्ती करण्यासाठी आमच्या टीमणे कार्य केले.
आमचे प्रेरणास्थान माझी आई स्व.शशिकलाताई चौधरी, वडील सेवानिवृत्त अधिकारी भाऊरावजी चौधरी,हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चे संस्थापक पद्मश्री पुरस्कार प्राप्त मा. प्रभाकरावजी वैद्य साहेब,डॉ. विनोद देशमुख-आपलें मानवाधिकार फाउंडेशन चे वर्धा जिल्हा व्यवस्थापक, राजेंद्रकुमार दूधकोर-निर्मिती फाउंडेशन संस्थापक हे आहेत.
सदर पुरस्कार हा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त मा. अण्णासाहेब हजारे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त मा. पोपटराव पवार साहेब, आपलें मानवधिकार फाउंडेशन चे संस्थापक डॉ.दीपेश पष्टे साहेब यांच्या हस्ते आपलें मानवाधिकार राज्यस्तरीय ३ रे अधिवेशन, राळेगण सिद्धी,ता. पारनेर, जि.अहमदनगर येथे देण्यात येणार आहे.
आपले मानवाधिकार राज्यस्तरीय आरोग्यदूत पुरस्कार डॉ. विवेक चौधरी यांना जाहीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 10, 2022
Rating:
