तरुणाची गळाफास घेवून आत्महत्या, लाठी बेसा येथील घटना

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील लाठी (बेसा) येथील एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि ९ डिसेंबर च्या रात्रीच केल्याचे आज सकाळी उघडीस आली.

राजेंद्र सुधाकर हजारे असे गळाफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस स्टेशन शिरपूर अंतर्गत येत असलेल्या लाठी (बेसा) येथील तरुणाने आपल्या राहत्या घरी रात्री उशिरा उशिरा घरचे झोपले असता, त्याने खोलीत गळाफास घेवून आत्महत्या केली.

सदर प्रकार आज शनिवारी सकाळी उघडीस आला. याबाबत वडिलांनी ताबडतोब शिरपूर पोलीस स्टेशन ला रीतसर तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठवण्यात आले. शवविच्छेदन करून नातेवाईकांना सोपावण्यात आले.

राजेंद्रच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास शिरपूर पोलीस करित आहे. 
Previous Post Next Post