टॉप बातम्या

मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकऱ्यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | न्यूज
7218187198

मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक झाल्याचे दिसून येते, काँग्रेस च्या वतीने तहसीलदार पुंडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी नरेंद्र पा ठाकरे, शरीफ अहेमद शरीफ कुरेशी, वसंतराव आसुटकर, मारोती गौरकार, शंकरराव मडावी यांच्या नेतृत्वात सिंचन, कर्जबाजारी, जड वाहतूक, रस्ते, प्रोत्साहन अनुदान, व दुष्काळ अनुदान या मागण्या मंजूर करण्यात याव्या अशा मागणी करण्यात आली.

मारेगाव तालुका हा अतिवृष्टी ने होरपळला असून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. अजूनही बळीराजा हा सावारला नाही. अशातच मारेगाव तालुका अनेक समस्यानी ग्रासला आहे. यावर प्रशासनाने ठोस पाऊले उचलावीव त्या मागण्या तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.. अन्यथा नमूद केलेल्या शेतकरी संबंधीच्या मागण्या घेवून आमरण उपोषण किंवा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा, इशाराही देण्यात आला आहे.

निवेदन देतांना यादवराव काळे, धनंजय आसुटकर, मारोती सोमलकर, अंकुश माफूर, यादवराव पांडे, विनोद आत्राम, रमण डोये, तुळशीराम कुमरे, रविंद्र धानोरकर, सैय्यद समिर सैय्यद अमीर, शकील अहेमद शरीर अहेमद आदी सह मारेगाव काँग्रेस कमिटी च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 
Previous Post Next Post