दि "वसंत" च्या निवडणुकीत विमानाने मारली अखेरच्या क्षणात "बाजी"

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
7218187198

वणी : रविवार दि.6 रोजी वसंत जिनिंग चे मतदान पार पडले. आज सोमवारी संपूर्ण उपविभागातील साऱ्यांचे लक्ष सकाळी 8 वा. सुरु झालेल्या मतमोजणी व निकालाकडे लागले असतांना पहिल्या फेरीत छत्री प्रथम स्थानी, दुसऱ्या स्थानी कपबशी तर तिसऱ्या स्थानी विमान होते. परंतु दुसऱ्या फेरीत मारेगाव झरी तालुक्यातील मतमोजणीला सुरुवात झाली आणि अचानक विमानाने भरारी घेतली. मात्र,पहिल्या फेरीतील निकाल पाहून जमावा मधील अदृश्य झालेले परत दृष्टीस पडू लागले आणि विजयाची आखणी करू लागले. आनंद पोटात मावेना..! विजयाची उत्सुकता शिगेला पोहचली आणि वणी तालुक्यात झालेली पिछाडी झरी मारेगाव तालुक्यात परिवर्तनने आघाडी घेतली. जय सहकार पॅनल व शेतकरी एकता पॅनल ला मागे टाकत अचानक मुसंडी मारत 17 जागा पैकी 15 जागा जिंकल्या. तर जय सहकार पॅनलला अवघ्या 2 जागा मिळवता आल्या. पॅनलचे सर्वेसर्वा अ‍ॅड.काळे व गोहोकार यांनाच फक्त विजय मिळवता आले. "रंगनाथ" ची पुनःरावृत्ती इथेही होईल अशीच प्रचाराची धुरा असतांना काळे साहेब यांना पहिल्या फेरीत घेतलेली आघाडी ती दुसऱ्या फेरीत घेता आली नाही. इथं त्यांचे क्षण भंगूर झाले. 
एकंदरीत चढाव उतार व मनोरंजनात्मक वातावरणात झालेल्या मतमोजणी व निकालातून "वसंत"ला परिवर्तनाचा बहर आला आणि विजयाची माळ माजी आमदार यांना घालत "द किंग इज बॅक" जल्लोष साजरा करित शिवतीर्थावर निवडून आलेल्या उमेदवारांचे हार पुष्पगुच्छाने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लाक्षणीय उपस्थिती पहायला मिळाली.

(विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतांना कासावार साहेब, माजी आमदार विश्वास नांदेकर व नरेंद्र पाटील ठाकरे)

परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार व मत

प्रमोद नत्थूजी वासेकर -2392
संजय रामचंद्र खाडे - 2376
पुरुषोत्तम केशव आवारी -2455
शंकर राजेश्वर वऱ्हाटे - 2295
जयकुमार नेमीचंद आबड -2215
घनश्याम रामचंद्र पावडे - 2183
विनोद यशवंत गोडे - 2173
गजानन मारोती खापणे -2189
अशोक दादाजी धोबे -2299
रविंद्र रामचंद्र धानोरकर - 2260

नामाप्र

आशीष आनंद खुलसंगे -2335

अनु.ज.

अशोक सदाशिव नागभीडकर -2373

भ. वि. जा.

राजेंद्र पुंडलिक कोरडे - 2511

महिला राखीव

साधना जयसिंग गोहोकर -2450
शारदा बाबाराव ठाकरे - 2315

जय सहकार पॅनलचे देविदास काळे व प्रशांत गोहोकार विजयी (सर्वसाधारण गट)



Previous Post Next Post