सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
9011152179
वणी : दि.8/11/2022 रोजी सकाळी 8 वाजता ग्रामपंचायत कार्यालय मोहदा येथे मा. जैनद्दीन जेव्हेरी माजी आमदार, माजी अध्यक्ष न प बल्लारपूर, सदस्य ऑल इंडिया हज कमिटी, माजी सदस्य वक्फ बोर्ड महाराष्ट्र राज्य, सदस्य पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त मा. इस्माईल जैनद्दीन जव्हेरी विदर्भ प्रो. प्रा. लिमिटेड मोहदा यांच्या कडून मोहदा येथील निराधार व दिव्यांन लोकांना ब्लॅंकेट्स वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अभिष्टचिंतन वाढदिवसाच्या सोहळ्याचे औचित्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे, या आयोजित कार्यक्रमाला नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन उपसरपंच सचिन रासेकर यांनी केले.