चिंचमंडळ येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीची जय्यत तयारी

सह्याद्री चौफेर | न्यूज
7218187198

मारेगाव : यंदा प्रथमच क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीची चिंचमंडळ येथे जय्यत तयारी सुरु आहे. त्यात सकाळी दहा वाजता प्रतिमेचे पूजन, मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच सायंकाळी बँड पथकासह भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.

आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन चिंचमंडळ गोंडवाना युथ संघचे अध्यक्ष सुरज मेश्राम व सचिव नारायण कोडापे वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिंचमंडळ गावातील गोंडवाना युथ संघ व संपूर्ण आदिवासी समाज बांधव कार्यरत आहे. 
चिंचमंडळ येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीची जय्यत तयारी चिंचमंडळ येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीची जय्यत तयारी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 13, 2022 Rating: 5
Powered by Blogger.