राहुल रामटेके | सह्याद्री चौफेर
7066027404
नागभिड : लॉईडस् मेटलस्,एनर्जी लि.सुरजागड व त्रिशरन एन्लायटनमेंट फाउंडेशन,पुणे शाखा एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक व सास्कृतिक कार्यक्रमानी संपन्न झाली.धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक १६ व १७ नोव्हेंबर रोजी भगवंत कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे विविध सामाजिक व सास्कृतिक कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धा, गोंड आदिवासी नृत्य स्पर्धा तचेस आदिवासी रेला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून एटापल्ली येथील अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी आयोजकांकडून आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते. एकूण ४५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी केले तर दीप प्रज्वलन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा वाघमारे यांनी केले. तर हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्रिशरण चे राज्य समन्वयक प्रशांत वाघमारे, जिल्हा समन्वयक सचिन कलेश्र्वर, तालुका सम्वयक मंगलदास मशाखेत्री यांनी केले. या कार्यक्रमाला भगवंत कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली यांच्या शिक्षक व प्राध्यपकांनी परिश्रम घेतले तर संस्थेचे स्वयंसेवक अंकुश करमरकर, यांनी कार्यक्रमांत आपले योगदान दिले. या स्पर्धेत कृष्णार येथील यांना द्वितीय पारितोषिक मिळाले या कार्यक्रमातचे संचालन अमोल वाळके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सचिन कालेश्वर यांनी मानले.