सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
सावली : रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथे हेल्थ ऐज इंडिया व प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बाल दिवस व मधुमेह तपासणी दिवस आयोजित करण्यात आले होते. मधुमेह व कोविड लसीकरण बाबत माहीती व आरोग्य विषयक माहिती देण्यात आली.
हेल्थ रोज इंडीया व अर्थसहाय्य "USAID "मोमेंटम रुटीन इम्युनायजेशन ट्रान्सफॉमेशन आणि इक्विटी( M-RITE) प्रकल्प अंतर्गत संपूर्ण-चंद्रपुर जिल्ह्या मधे लसीकरणाला गती मिळावी याकरिता तालुका स्तरावर व गावा-गावामध्ये स्वयंसेवक कार्य करत आहे, शाळेकरी विद्यार्थी पासुन ते पुढे सर्व वयोगटात येणारे लोकांना लसीकरण पूर्ण होण्यासाठी आरोग्य विभाग व स्वयं सेवक समन्वय साधुन लसीकरण पूर्ण करण्याचे कार्य करत आहे. दिनांक 14 नोव्हे. जागतीक बाल दिवस व पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती चे औचीत्य साधुन कोविड लसीकरण बाबत समुपदेशन करण्यात आले व मुलाना कोनतीही लस घेण्यासाठी मनात भिती निर्माण होनारी भिती दुर होण्यासाठी मुख्याध्यापक शेन्डे सर,यांनी माहीती दिली मेश्राम सर, लाकडे सर, कस्तुरे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.गोबाडे सर, डाॅ.जोगदंड सर, हेल्थ ऐज इंडिया चे जिल्हा समन्वयक किशोर गायकवाड सर, तालुका स्वयंसेवक दुर्योधन देवतळे, नरेश वैद्य, वासेकर सिस्टर तसेच रमाबाई आंबेडकर विद्यालय येथील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेंडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन हेल्थ ऐज इंडिया चे तालुका स्वयंसेवक दुर्योधन देवतळे यांनी केले. व ४३ मुलानी आपले लसीकरण पुर्ण कऱुन घेतले.