सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
चंद्रपूर : एकेकाळी मागास व दुर्लक्षित समजला जाणारा पोंभुर्णा तालुका आज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला असून या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मला याचा अभिमान व आनंद आहे. नागरिकांनी विकासासंबंधी जी मागणी केली ती मी प्राधान्याने पूर्ण केली. गंगापूर टोक येथे आमदार निधीतून नाली बांधकामासाठी १० लक्ष रू. निधी तर सभागृह बांधकामासाठी १० लक्ष रू. निधी उपलब्ध केला आहे. आदिवासी विकास विभागाच्या निधीतुन रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. हा परिसर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या परिसर आहे. यावर्षी धानाला बोनस मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले व लवकरच धानाला बोनस मिळणार आहे. नागरिकांच्या मुलभूत गरजांसह शेतक-यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न याला प्राधान्य देत हा परिसर अधिक विकसीत होईल यादृष्टीने आपण प्रयत्नांची शर्थ करू, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मस्त्यव्यवसाय तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.