टॉप बातम्या

महागांव तलाव कॅनलची झालेली दुरावस्था लवकरात लवकर करा - उपसरपंच अविनाश लांबट यांची मागणी


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : मौजा महागाव तलाव येथील मेन कॅनल हा सिंधी मांगली शिवारापर्यंत गेला असून त्या कॅनलने पूर्ण गाळ साचला असून मोठमोठे झाडी व भरपूर प्रमाणात गवत सुद्धा वाढलेले आहे. त्यामुळे कॅनलच्या वरून पाणी जावून  शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होवू लागले असून मारेगाव लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते, या पूर्वी सुद्धा लघु पाटबंधारे कार्यालयाला निवेदन दिले होते, मात्र संबंधित प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे ग्राम पंचायत सिंधी महागाव येथील उपसरपंच अविनाश लांबट यांनी 'सह्याद्री चौफेर' बोलतांना सांगितले.  आहे.

आता संबंधित विभागातील भोंगळ कारभाराकडे वरिष्ठानी लक्ष घालून महागांव तलाव कॅनलची झालेली दुरावस्था लवकरात लवकर करण्यात यावे  अशी म्हणी अविनाश लांबट यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. 
Previous Post Next Post