सह्याद्री चौफेर | न्यूज
निवेदनात असेही म्हटले आहे की, दि. 13 ऑक्टोंबर रोजी सुद्धा शहरातील रंगारीपूरा, शाळा क्र. 8 जवळ रात्री पुन्हा चोरी झाली. शहरातील कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा न झाल्यास बाळासाहेबांची शिवसेना च्या वतीने आंदोलन करण्यात येईल. यावर उद्भवणाऱ्या परिस्थीतीस आपण जबाबदार राहाल असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना गटाने निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाच्या प्रतिलिपी मा.ना. श्री. संजय राठोड मंत्री, अन्न व औषधी प्रशासन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांना देण्यात आले आहे.
यावेळी मणीष सुरावार, किशोर नांदेकर,राजु तुराणकर, टिकाराम खाडे, ललित लांजेवार, सुधाकर गोरे, प्रेमनाथ ढवस, देवेंद्र दोडावार सह कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची जिल्हा कार्यालयात बदली…!
वणी शहरात सातत्याने घर फोडी, लुटमार, दुचाकी चोरी, मारामारी, अवैध धंदे , पत्रकारावर चोरट्यांकडून झालेला जिवघेणा हल्ला, पत्रकारांचा पोलिस स्टेशनवर ठाणेदाराच्या बदलीसाठी मोर्चा, मारेगाव, मुकुटबन येथिल पत्रकारांच्या वतिने ठाणेदाराच्या बदलीसाठी निवेदन, स्थानिक आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांची आय जी मिना यांच्याकडे ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या बदलीची मागणी, समाजसेवक नारायण गोडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ठाणेदाराच्या बदलीची केलेली मागणी, एकंदरीत वणी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतांनाच चोरट्यांकडून झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्याची सर्व स्तरातून दखल घेण्यात आली. विशेष म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात वणी शहरात पहिल्यांदाच पत्रकारांच्या वतिने मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात आला व ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ वणीत दाखल झाले. पत्रकारांशी संवाद साधताना मात्र ठाणेदाराची पाठराखण करत उलट काही पत्रकारांनीच ठाणेदार हटविण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप केला. दुध का दुध, पाणी का पाणी होईल असेही त्यांनी सांगितले. मात्र आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांनी पत्रकारांच्या मागणीची दखल घेत ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या बदलीसाठी वेगाने हालचाली केल्याने अखेर ठाणेदाराची बदली जिल्हा कार्यालयात करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असुन आता केदारे की सोनटक्के यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे.