कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
दिवाळी समोर असतांना हातातलं कापूस सोयाबीन सारखं पीक मातीमोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच अतिवृष्टी ने मेटाकुटीस आलेला शेतकरी मायबाप नुकसान भरपाई मिळेल या आशेत बसला आहे. अशातच वरूण राजाने तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला असं चर्चील्या जात आहे.
आज किमान अर्धा तास झालेल्या पावसाने शेतकरी चिंतेत आले आहे. एकीकडे सरकार लक्ष देईना तर दुसरीकडे वरुण राजा जगू देईना अशा परिस्थितीत जगाच्या पोशिंद्याने काय करावं? असा प्रश्न आज अचानक झालेल्या पावसाने निर्माण केला असतांना आता शासनाच्या मदतीची तात्काळ गरज आहे.. अतिवृष्टी चं काम प्रशासन स्तरावर सर्व आटोपलं, असं वाचण्यात येतय.. मग आता खात्यात जमा होणं च बाकी आहे... त्यामुळे आज तालुक्याच्या ठिकाणी काहींशी रेलचेल पहायला मिळाली. आणि अशातच पावसाने कोसळधार हजेरी लावली... ती अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये...!