कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवात वणी येथील टिळक महाविद्यालयाच्या चमूने दमदार समूहागीत सादर केले. देशभक्ती गीत "सूरज बदले चंदा बदले, बदले चाहे ध्रुव तारा" सादर केले, व लगेच राजस्थानी लोकगीत "रुनुझुण बाजे घुगरा" हे गीत सादर केले. सभागृहात सर्व रसिकांनी टाळ्यांचा पाऊस पाडला आणि दोन्ही गीतांचा आनंद घेतला.
परीक्षकांनी सादर करणाऱ्या चमूचे तोंड भरून कौतुक केले. अतिशय उत्तम गाणं बसविण्यात आले होते. सोनम सुरपाम, अंकिता भोयर, कीर्ती देवतळे, जयश्री बोढे, वैष्णवी हणमंते, तृप्ती जुमडे यांनी सादरीकरण केले. दोन्ही गाण्याचे दिग्दर्शन अभिलाष राजूरकर यांनी केले असून विद्यार्थ्यांकडून उत्तम सराव करून घेतला. यावेळी हार्मोनियम वर संजय मेश्राम, ढोलकवर अक्षय करसे यांनी साथसंगत केली.