सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
सावली : नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली येथील महात्मा फुले चौका समोर चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या ट्रक एम एच 49 1127 ने आपल्या नातेवाईक ला भेटून गावाकडे जाणाऱ्या शिर्शी येथील उपसरपंच दादाजी किन्हेकार यांचा मुलगा व आई हे जात असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने त्याला जोरदार धडक दिली व त्यांना चिरडून ट्रक पुढे नेण्यात आले.व ट्रक चालक पोलीस स्टेशन च्या परिसरात ट्रक सोडून फरार झाला. ही घटना साडे सहा वाजताचे दरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळताच सावली चे ठाणेदार साहेब आशिष बोरकर हे त्वरित घटनास्थळी आपली चम्मु घेऊन दाखल होत अपघातातील दोघांना पोलीस वाहनाने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.परीसरातील लोकांना
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी करण्यात आली.सदर घटनास्थळी पोलीस असून रुग्णालयातही गर्दी वाढत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तपास कार्याला लगेच सुरुवात केली आहे. या घटनेतील मृतकांची नावे बबलु उर्फ देवानंद दादाची किन्हेकार वय 28 वर्षे व लक्ष्मीबाई आनंदराव किन्हेकार वय 75 वर्षे असे असुन पुढील तपास सावलीचे ठाणेदार आषिश बोरकर करीत आहेत.