टॉप बातम्या

वेगाव येथील तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मौजा वेगाव येथील एका तरुणाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज दिनांक 20ऑगस्टला पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.

अविनाश जीवन मेश्राम (अंदाजे 28) रा.वेगाव असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहिती नुसार अविनाश यांने दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोज गुरूवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान स्वगृही विष घेतल्याची माहिती कुटबियांना मिळताच त्यांनी तातडीने उपचारांसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान चंद्रपूर येथे त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अजुन अस्पष्ट आहे.  अविनाश यांच्या पाठीमागे आई-वडील,एक मोठा भाऊ,असा बराच आप्त परिवार आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();