कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : मौजा बोरगाव (मेंढोली) येथील प्रफुल अर्जुन गाडगे (अंदाजे वय 32 वर्षे ) हा मागील दोन दिवसापासून बेपत्ता होता. काल दि.19 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 8 वाजताचे दरम्यान सदर गावातील विहिरीमध्ये त्याचा मृतदेह तरंगत असल्याचे गावाकऱ्यांना लक्षात आले.
मृतक हा अविवाहित असून मृतकाचे नावे मौजा उकणी ता. वणी येथे सामाईक शेतजमीन आहे. मृतक हा अविवाहित असून त्याला दारूचे व्यसन होते, दारूच्या नशेत त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला असे, स्थानिक चौकशीनुसार समजते.
प्रफुल याच्या पश्चात आई, मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे.