वणी : तालुक्यातील धोपटाळा येथील युवकाने शेतात गळाफास घेवून आपली जीवनयात्रा आज दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी अंदाजे साडे सात वाजताचे सुमारास संपवल्याची घटना उघडीस आली.
सदानंद विठ्ठल दोरखंडे (22) असे गळाफास घेतलेल्या मृतक युवकाचे नाव आहे. आज रोजी त्याने घरच्या शेतात गळाफास लावला असता त्याच्या वडिलांच्या निदर्शनास आले. लगेचच त्याला ग्रामीण रुग्णालय वणी येथे उपचारासाठी नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.
मृतकाच्या नावे धोपटाळा येथे शेतजमीन आहे. मृतकाच्या पाठीमागे आई वडील असा आप्त परिवार आहे.