कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव व झरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे वतीने आगामी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकासंदर्भात वणी येथील शेतकरी मंदिरात पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावापदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. प्रफुल मानकर हे होते. प्रमुख पाहुणे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा महिला अध्यक्षा वंदना आवारी, तालुका महिला अध्यक्षा संध्याताई बोबडे, शहर अध्यक्षा सविता ठेपाले, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, सेवादल अध्यक्ष प्रमोद लोणारे, जिल्हा सेवादल अध्यक्ष राजू कासावार, सौ. मॅकलवार, अरुणा ताई खंडाळकर, आशाताई टोंगे, जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख, महेंद्र लोढा, अॅड. देविदास काळे, उत्तम गेडाम, नरेंद्र पाटील ठाकरे, राजाभाऊ पाथरडकर, डॉ मोरेश्वर पावडे, डॉ भाऊराव कावडे, पुरुषोत्तम आवारी, सुनील वरारकर, प्रशांत गोहोकार, बँकेचे संचालक राजू एलटीवार, आशिष खुलसंगे, रवींद्र धानोरकर, अंकुश माफूर, मारोती गौरकार उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाची माजी नगरसेविका मंदा पुसनाके याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी केले.
मार्गदर्शन करताना ठाकरे पुढे म्हणाले, जर कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन मनामध्ये गाठ बांधली की या निवडणुका जिंकायच्याच आहे तर कोणीही त्यापासून वंचीत करू शकत नाही. त्यासाठी कार्यकत्यांनी प्रचार व्यवस्थित केला तर कोणतीही निवडणूक हरण्याचा विषय येत नाही. ही जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे असे मत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री वसंतराव पुरके, अॅड. प्रफुल मानकर, माजी आमदार वामनराव कासावार ऍड देविदास काळे,महेंद्र लोढा, जफार अली खान, अरुणाताई खंडाळकर, वंदना आवारी यांनी मनोगत व्यक्त केले. या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्रात युवक काँग्रेस च्या नवीन जबाबदारी देण्यात आल्या आहे. यात धनंजय आसुटकर (युवक काँग्रेस मारेगाव तालुका अध्यक्ष),
शेखर बोनगीरवार (युवक काँग्रेस झरी तालुका अध्यक्ष),
अतुल चटकी (युवक काँग्रेस वणी तालुका अध्यक्ष) ह्याच्या नियुक्ती करण्यात आल्या आहे. तूर्तास युवक काँग्रेस मध्ये युवकांना संधी मिळाल्याने वणी विधानसभा क्षेत्रात युवकांमध्ये उत्सहाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर यांनी केले तर आभार प्रमोद निकुरे यांनी मानले या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वणी शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.