वणी : मौजा डोर्ली येथील एका युवकाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही तालुक्यातील तिसरी घटना असल्याने वणी तालुक्यात आत्महत्याच्या घटनेत सतत वाढ होतांना दिसत असून यासाठी प्रशासन स्तरावरुन विशेष जनजागृतीची गरज असल्याचे बोलल्या जात आहे.
योगेश्वर विठ्ठल थेरे (अंदाजे 22 वर्षे) असे अविवाहित युवकाचे नाव आहे. दि.20 ऑगस्ट रोजी अंदाजे सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मौजा येनक शिवारात विष घेवून मृत्यू झाल्याचे समजते. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मृतकाच्या नावे व्यक्तिगत शेत व सामाईक शेती असून योगेश्वर यांच्या पश्चात आई असा आप्त परिवार आहे.