टॉप बातम्या

रासेयो विभागाकडून विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वातंत्राचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हा उपक्रम दिं.13 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये जनजागृती रॅली, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत व सामूहिक राष्ट्रगान आदि कार्यक्रमातून समाजामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी हाच एक उद्देश ठेऊन महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. जीवन पाटील कापसे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपस्थित प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर, महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी समस्त विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर व प्रा. डॉ. सोडनर सर, डॉ. चवरे सर, डॉ. कुलकर्णी सर, डॉ. चव्हाण सर, डॉ. ताणूरकर मॅडम, डॉ. घोडखांदे मॅडम, डॉ. कांबळे मॅडम, प्रा. गडपायले मॅडम, प्रा. आत्राम सर, प्रा. माकडे सर, प्रा. जेणेकर सर, प्रा. वांढरे सर या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेकारिता रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. विजय भगत, प्रा. माधुरी शेंडे, प्रा. स्नेहल भांदकर व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();