टॉप बातम्या

येनक येथील सिमेंट सेड बांधकामतील गैरप्रकार व निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी करण्यात यावी - ग्रामपंचायत सदस्य अनिल तेलंग यांची मागणी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी :  १८ ऑगस्ट २०२२ रोजी या.गटविकास अधिकारी (पण.स),वणी यांना ग्रामपंचायत येनक येथील भोंगळ व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी अनिल तेलंग (ग्रामपंचायत सदस्य), येनक निवेदनातून तक्रार दाखल केली.
सदर तक्रारी मध्ये ग्रामपंचायत येनक येथील वार्ड क्रं. 1 मधील रस्ता बांधकाम संगनमताने होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी व उत्कृष्ट काम व्हावे यासाठी त्यांनी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांनाकडे केली असून दिलेल्या निवेदनात जि.प.बांधकाम विभागाने घालून दिलेल्या अटींचे पुर्णतः उल्लंघन करून संबंधित बांधकाम कंत्राटदार व ग्रामपंचायत सत्ताधारी मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. मूळ प्रस्तावित रस्ता बांधकाम आराखड्यात समाविष्ट काम न करता, त्यात कोणतीही परवानगी न घेता व तसा बदल झाल्याची कोणतीही नोंद नसतांना रस्ता बांधकामात बदल केले. त्यामुळे रस्ता बांधकामात सत्ताधारी व ठेकेदार भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार मा.गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य अनिल तेलंग यांनी केली आहे.
रस्त्याचे बांधकाम करतांना 0.20 मीटर जमिनीचे खोदकाम करणे आवश्यक असतांना ठेकेदाराने तसे केले नाही. त्यामुळे रस्ता मजबूत व टिकाऊ न करता भोंगळ काम केले जात आहे. रस्त्याचे खोलीकरण करून 80 मिमी गिट्टीचा काँक्रेटसाठी वापर होणे गरजेचे असतांना खोलीकरण न करताच 50 मिमी गिट्टीचे काँक्रेट पसरविण्यात आले आहे. अशा प्रकारच्या अनेक त्रुटी या रस्ता बांधकामात असल्याने अतिशय निकृष्ठ दर्जाचा हा रस्ता तयार होत आहे. या रस्त्याच्या बांधकामात मोठा गैरप्रकार करण्यात आला असून यात सरपंच व ठेकेदाराची मिलीभगत दिसून येत असल्याचा आरोप ग्रा.प. सदस्य अनिल तेलंग यांनी केला आहे.

त्यामुळे या सिमेंट रस्ता बांधकामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी अनिल तेलंग यांनी प.स. गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून तक्रार अर्जातून केली आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();