टॉप बातम्या

नात्यात संशय, पत्नीवर हल्ला !

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, संशयावरून नवऱ्याची बायकोला बेदम मारहाण, बायको सतत संशय घेते या त्रासाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, सतत भांडणे आणि संशयाच्या कारणावरून देशात अनेक जोडपी घटस्फोटाच्या मार्गावर....अशा बातम्या आपण वाचतो, पाहतो, ऐकतो. मन सून्न होतं. केवळ संशयाच्या कारणामुळे होणारी अनेक कुटुंबांची होरपळ पाहून खरोखर मनातून हादरून जायला होते. अत्यंत तरुण वयात आणि ऐन उमेदीच्या काळात संसाराला बसणारे झटके अनेकांची आयुष्य उध्वस्त करून टाकतात. चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच काहीशी घटना नायगाव येथे जि प शाळेवर रुजू असलेल्या शिक्षिका वैशाली छल्लावार (40) रा. चंद्रपूर ही शाळेचे तासिका संपल्यानंतर चंद्रपूरला जाण्यासाठी बेलोरा फाट्यावर बसची वाट पाहत असतांना तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. यात त्या गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तात्काळ घुग्गुस येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. मात्र, या घडलेल्या प्रकरणातील एकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर घडलेल्या प्रकरणाचा मोठा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. आरोपी मोहम्मद रजा अब्बास अन्सारी (22) रा. चंद्रपूर असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून अवघ्या एका दिवसातच पोलिसांनी सदर घटनेचा पर्दाफास केला. चक्क! हल्ला घडवून आणणारा त्या शिक्षिकेचा पतीच मुख्य "सूत्रधार" असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ आरोपी पती जितेंद्र मशारकर (45) रा चंद्रपूर असे त्याचे नाव आहे. तसेच संजय राजेश पट्टीवार (30) रा. चंद्रपूर यालाही या जीवघेण्या हल्ला प्रकरणात अटक केली. या तिघांवर पोलिसांनी भांदवी कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सूत्राच्या माहितीनुसार याआधीही या शिक्षिकेवर दोन वेळा हल्ले करण्यात आले होते. ही शिक्षिका दुचाकीने जाणे-येणे करित असतांना त्यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना पडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्यानंतर त्यांनी दुचाकीने जाणे-येणे बंद करून बसचा प्रवास सुरु केला. पण मात्र, संशयाने झपाटलेला पती, 0पत्नीचा गेम करण्याची संधी एनी टाइम शोधतच होता. अशातच काल त्याने गेम सेट करून भाडोत्री गुंडांना त्यांच्यावर हल्ला चढविण्याची सुपारी दिली. शाळा सुटल्यानंतर शिक्षिका घरी जाण्याकरिता बेलोरा फाट्यावर बसची वाट पाहत असतांना आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढविला. पण शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे आरोपींचा नेमका वार हुकल्याने त्या थोडक्यात बचावल्या. शस्त्राचा वार त्यांच्या कानावर गेला. त्यात त्या जखमी झाल्याने त्यांना घुग्गुस येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हल्ला चढविणाऱ्या आरोपींसह त्यांच्या मुख्य सूत्रधार पतीला अटक केली आहे.

या घटनेचा अधिक तपास शिरपूर स्टेशनचे ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात पी एस आय रामेश्वर कंदुरे व शिपाई अनिल सुरपाम करित आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();