पावसाअभावी खोळंबली रोवणी

(file photo)

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : मागील वर्षीप्रमाणे या वर्षी पावसाने दंडी मारल्याने जिबगांव क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असुन काही शेतकऱ्यांचे परे करण्याच्या मार्गावर आले असल्याने आसोला मेंढा नहराचे पाणी सोडण्यात येवुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.
मागील आठवड्यात नियमीत पाऊस असल्याने शेतकऱ्यांचे रोवणी सुरुवात केली. काही रोवणी पण पुर्ण झाले असुन काही शेतकऱ्यांचे रोवणी खोळबली असुन पाऊसाने दडी मारल्याने जिबगांव, सिर्सी, पेढगांव माल, रैतवारी, चक पेडगांव, कोडेखल, जाब बुज, केरोडा आदी गावातील रोवणी खोळंबली आहेत.
आज येणार उद्या येणार या अपेक्षेने शेतकरी पाऊसाची वाट पाहु लागला लागला पण त्याला निराशेच्या पलीकडे काही च मिळत नाही तरी शेतकऱ्यांचे दखल घेत आसोला मेंढा नहराचे पाणी सोडण्यात येवुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();