युवकाची विद्युत खांबावर चढून आत्महत्या

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मौजा बोटोणी येथे एक युवक इलेक्ट्रिक खांबावर चढून विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारेला स्पर्श करीत त्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना उघडीस आली. सदर धक्कादायक प्रकार मंगळवार ला रात्री 10 वाजताच्या सुमारास घडला असल्याचा कयास आहे.   
बळीराम मारोती घाटे (22) असे विद्युत खांबावर चढून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गावाच्या मागील  बंधाऱ्या शेजारी असलेल्या इलेक्ट्रिक पोलवर चढून चक्क त्याने विद्युत प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श केला.
यातच त्याचा मृत्यू होऊन खाली आदळला. त्याच्या अशा जीवनयात्रा संपविण्यासाठी वेगळी क्लुप्ती करणाऱ्या घटनेचे कारण मात्र अस्पष्ट असून, मृतकाच्या पाठीमागे आई, दोन भाऊ व बहीण असा बराच आप्त परिवार आहे.