बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : टीचर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने औरंगाबाद येथील बळीराम पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक मुक्तेश्वर बाबुराव श्रीमंगले यांनी जिवा सेनेच्या माध्यमातून उदगीर तालुक्यात विविध उपक्रम राबवून एक आपला वेगळा ठसा निर्माण केलेला असून त्यांनी उदगीर येथील वसंतराव नाईक विद्यालयाच्या वतीने सोमनाथपूर भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणोत्तेसाठी खूप प्रयत्न करून शाळेची गुणवत्ता वाढवण्याचे त्यांनी सदोदित प्रयत्न केले असून ते गणित विषयाचे उत्कृष्ट अध्यापन करतात एवढेच नाही तर ते एक उत्तम शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या या विविध कार्याची दखल घेवून अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळकांची पुण्यतिथीचे औचित्य साधून टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा संस्थापक अध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी यापुढेही विविध उपक्रम राबवण्याचे त्यांनी सांगितले आहे.