शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवा - वणी काँग्रेस सेवादलाची मागणी


सह्याद्री चौफेर

वणी : शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजावण्यात यावे अशी मागणी वणी शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने करण्यात आली. याबाबत मुख्याधिकारी वायकोस यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शहर अध्यक्ष प्रमोद लोणारे सेवादल, इजहार भाई शेख, विकेश पानघाटे, नईम अजिज, सुधीर खंडाळकर, राजू पेंढारकर, इरफान सय्यद, सुमित ठाकरे, महादेव दोडके, व साहिल सय्यद आदीची उपस्थिती होती. 
पावसाचे दिवस होऊ घातल्याने शहरात अनेक मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून,शहरातील खड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून खड्डेमय रस्त्याने जावं लागतं, पाणी साचलेल्या खड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे मुरूम, गिट्टी चा भर टाकून शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजावण्यात यावे अशी मागणी वणी काँग्रेस सेवादलाच्या वतीने करण्यात आली.
जर का? हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात आले नाही तर आम्हाला आंदोलन छेडावे लागेल,असा इशारा दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.
            जाहिरातसाठी संपर्क : 9011152179
             जाहिरातसाठी संपर्क : 9011152179
शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवा - वणी काँग्रेस सेवादलाची मागणी शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवा - वणी काँग्रेस सेवादलाची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 05, 2022 Rating: 5
Powered by Blogger.