टॉप बातम्या

कासारबेहळ येथे अवैध दारूचा महापूर

नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर

महागांव : कासारबेहळ येथे ग्रामसभा पार पडली त्यात ग्रामस्थांनी अवैध दारू चा प्रश्न उपस्थित केला होता. दारू बंद करा म्हणून गावकऱ्यांची आग्रही मागणी आहे.

तालुक्यातील कासारबेहळ येथील होणारा दारू चा महापूर बंद करा याबाबत गावाकऱ्यांनी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केला होता. "गांव तसं चांगले पण वेशीला टांगले" असे बोलल्या जात आहे. येथील टी पॉईंटला राजरोसपणे दारू विकल्या जात असल्याची लोकांमधून ओरड आहे. या दारू मुळे अनेकांची कुटुंब उध्वस्त होत असल्याचे लक्षात घेवून पोलीस प्रशासनाने दारू बंद करावी अशी नागरिकांतून आग्रही मागणी होत आहे.

ग्रामसभेत ठराव घेवून सुद्धा अवैध दारू विकल्या जाते तरी कशी, कोण यांना पाठीशी घालतं, कुणाचा यांचे वर वरदहस्त आहे असा अनेक प्रश्न जनसामान्यातून उपस्थित आहे. 

परिणामी येथील अवैध दारू बंद करा अशी मागणी जोर धरत आहे. 
Previous Post Next Post