नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर
यवतमाळ : पुसद-विधानसभा मतदारसंघात जि.प. बांधकाम विभागाच्या अंतर्गत विकासात्मक कामात प्रचंड प्रमाणावर आर्थिक अनियमिता मागील महाविकास आघाडी शासन कालखंडात स्थानिक प्रस्थापित नेत्यांच्या राजाश्रयाच्या अभयदानामुळे कंत्राटदार मनमानी पद्धतीने शासन निधीचा स्थानिक भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासकीय यंत्रणाच्या समन्वयाने विकासाकामात ग्रामीण विभागातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अपहार करून मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा, हा किळसवणा प्रकार या विधानसभा क्षेत्रातील चार गावात प्रत्यय आला आहे असून
विकासाच्या नावावर वानवा असलेल्या या पुसद विधानसभा मतदार संघात यापूर्वी निंबीपारडी, हुडी, काळी दौलत खान, व आता जमशेदपूर जिल्हा परिषद सर्कल मध्ये जनसुविधेच्या नावावर कोट्यावधी रुपयाची लुटीची दरोडेखोरी या कंत्राट दाराकडून झाल्याचे समोर येत आहे.
जमशेदपूर या गावात अग्नि संस्कार करत असताना त्या जळत असलेल्या चित्यावर समशानभूमीचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली याबाबत स्थानिक प्रशासन मुग गिळून का? गप्प बसून आहे. स्थानिक लोकनियुक्त आमदार गुणवत्ता विभागाकडे संबंधित निकृष्ट झालेल्या कामाच्या सबंधाने चौकशीचे लावण्याच्या संबंधाने पत्र देण्याचे धाडस दाखवेल का..? याबाबत वेळोवेळी आम्ही आमदाराकडे संबंधित कामाच्या सबंधाने लक्ष घालण्याची विनंती केली मात्र, याकडे अक्षम्य दुर्लक्षितपणा स्थानिक प्रस्थापित नेत्याकडून झाले. म्हणून यांच्या हेतू कार्यपद्धती बद्दल समाजमनामध्ये शंका निर्माण होत आहे.
नावालाच उरलेली पंचायतराज व्यवस्था व गुणवत्ता विभाग या विभागाने विश्वासहर्ता गमावली आहे. त्यामुळे जिल्ह्यास कर्तव्यदक्ष लोकाभिमुख प्रशासन देणारे जिल्हाधिकारी हेडगे साहेब त्याचसोबत जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पांचाळ साहेब या कंत्राटदारावर कठोर कारवाई करून ब्लॅकलिस्टसह यांच्यावर गुन्हे दाखल करणार का..? भ्रष्टाचाराचे संपूर्ण मर्यादेच्या कक्षा कंत्राटदारांनी ओलांडल्या त्यामुळे वाढत चाललेल्या मुजोरीला आवर घालून या बेलगाम कंत्राटदाराला लगाम लावणार का..? हे मोठ कोडं पुसद विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिकाला पडलेला आहे.
विकासाच्या नावावर घरघर लागलेल्या या पुसद विधानसभा मतदार संघात शहरी व ग्रामीण नागरिकांची कोंडी झाली आहे. हतबल व हताश असलेले सामान्य नागरिक नेत्यांच्या निष्क्रियते च्या कार्यपद्धतीला बळी पडत आहे. भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडून मूलभूत भौतिक सोयीसुविद्यांच्या अभावामध्ये ग्रामीण विभाग अस्वस्थ आहे. भ्रष्ट यंत्रणेच्या कारभाराचा वाढता आलेखामुळे संपूर्ण मतदारसंघात त्राही त्राही असून यावर कोणाचे नियंत्रण नाही, विकासाच्या नावावर नागरिकांना छळण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे ग्रामीण विभागातील नागरिकांची आर्त टाहो असा विकास आता नकोसा झालेला आहे.
बहुतांश ठेकेदार हे नेत्यांचे चेले, चपाटे, कार्यकर्तेच असतात. जणू यांच्यामध्ये हे गावातील रस्ते विकास, नाली, जन सुविधेचे काम, सांस्कृतिक भवन हे घेण्याची ओढ लागल्याचे दिसते. या मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या कंत्राटदारांवर चपराक बसावी व यासाठी जवाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अथवा गुन्हे दाखल करावे, आर्थिक अनियमित्तीसाठी या जमशेदपूर व इतर गावांमध्ये घडलेल्या घटनेसाठी मनिष भाऊ जाधव (शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष यवतमाळ) यांनी विविध सोशल मीडियाच्या व माध्यमातून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, आमदार, सर्वपक्षीय आमदारांनी या सर्व विषयावर आता चिंतन करायला हवे.
आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करत नसून गावगाड्या मधला माणूस त्रस्त झालेला आहे. त्याचा मानसिकतेचा उद्रेक होण्याची वाट आता नेत्यांनी पाहू नये व जनसामान्य ग्रामीण विभागातील गाव, तांडा, वाडी, वस्तीवरील आलेल्या तक्रारीचे निवारण व निर्वाळासाठी प्रशासन व शासन दरबारी प्रश्न, दखल होत नसल्यानं प्रशासनावरचा विश्वास देखील लोकांचा उडालेला आहे. म्हणून या गंभीर घटनेची दखल जिल्हा प्रशासनाने व ग्रामविकास मंत्रालयाने घ्यावी. काळी दौलत खान जि.प. सर्कल सह संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील जि.प. बांधकाम विभागांतर्गत झालेल्या विकासात्मक कामाची गुणनियंत्रण विभागाच्या माध्यमातून मूल्यमापन होऊन एसआयटी चौकशी करण्यात यावी. यासाठी विधिमंडळात येणाऱ्या अधिवेशन कालखंडात तारांकित, लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून चौकशी व्हावी, या भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी माझा प्रयत्न असेल
असे मनीष भाऊ जाधव (शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष यवतमाळ) यांनी प्रसिद्धी पत्रकातून आवाहन केले आहे.