कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : गेल्या काही दिवसात उकणी, बोरगाव सह खान परिसरात वाघाची दहशत सुरू असून, अनेकांना वाघ दिसल्याची घटना समोर आली असून सध्या तरी त्या वाघाने कोणताही अनुचित प्रकार केला नसून तो वाघ नरभक्षी होण्या आधी संबंधित विभागाने यावर तातडीने उपाय योजना करून वाघांना जेरबंद करण्याची गरज निर्माण झाली आहे, त्यातच एकटा वाघ नसून दोन ते तीन वाघ असल्याचे वन विभागाला अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
वाघ दिसल्याच्या मोठ्या घटना शिरपूर, निलजई, सुंदरनगर, तरोडा, लाठी बेसा, बेलोरा, उकणी, निवली, पिंपळगाव, जुनाळ आदी कोळसा खान परिसरात हा वाघ अजूनही आपला मुक्त वावर करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उकणी व बोरगाव येथील यूवकांना कोळसा खान परिसरात वाघाचे दर्शन झाल्याचे युवकांच्या तोंडून वाच्या बंद झाली होती, त्यातच युवकाने हिम्मत दाखवीत आपल्या मोबाईल च्या कॅमे-यात त्या वाघाला केद करून खरच वाघ आला असल्याचे जिवंत उदाहरण दाखवले आहे. यावरून तेथील यवकांनी वाघाचा या परिसरात वावर असल्याचे संबंधित वन अधिका-यांना सांगताच सदर
वनअधिकारी सदर परिसरात दाखल झाले, त्यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्व परिसरातील गावांना व तेथील गावक-यांना सतर्कतेचा इशारा देत रात्र पाळीला बाहेर निघताना सांभाळून निघावे आणि सतर्कता बाळगावी असा संदेश देत, बाघ त्यादिशेने निघाला होता त्याच दिशेने वन विभागाच्या अधिका-यांनी चौकशी केली.
उकणी येथे वाघाचे दर्शन घेतल्यानंतर आता वाघांनी आपला मोर्चा बोरगाव, पिंपळगाव कोळसा खान परिसरात वळविला असून अनेकांना वाघाचे दर्शन झाले असून हा वाघ त्या परिसरात सारखा घिरट्या घालत असल्याचे दिसून येत असून वाघाच्या या दहशतीमुळे रात्र पाळीवर जाणा-या शेतकरी शेतमजुरांनी सुद्धा आपले जाणे बंद केले असून केव्हा कोणती अनुचित घटना घडणार हे सांगणे कठीण झाले आहे. त्यातच दोन ते तीन वाघ असल्याची माहिती असुन मुक्त वाघाच्या संचारावर वन विभाग ठाम निर्णय केव्हा घेणार? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांत पडला आहे, तरी वेकोली प्रशासनाने देखील आपल्या कर्मचा-यांच्या दृष्टिकोनातून ठाम भूमिका घेण्याची गरज आहे, मोठी घटना घडण्या अगोदर या वाघांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
2 ते 3 वाघ असल्याची चर्चा.....
परिसरात वावर असल्याचे संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत दिसून येत असून या परिसरात वाघ नेमके आहे किती? असा प्रश्न परिसरातील जनतेत असून याठिकाणी दोन ते तीन वाघ असल्याचे सुद्धा अधिकृत सांगण्यात आले आहे, त्यामळे हे वाघ आक्रमक होण्या आधी संबंधित विभागाने यावर उपाय करण्याची गरज आहे.
वन विभाग ऍक्टिव्ह मोडवर.....
वाघ जरी शांत असले तरी परिसरातील परिस्थिती लक्षात घेता तात्काळ त्याच परिसरातील दोन खाजगी इसम गस्तीवर ठेवण्यात आले असुन, वणी वन परीक्षेत्राची चमू तयार करण्यात आली आहे, तसेच दिनांक 14 ला सदर चमू बोरगाव येथे दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, तसेच परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा वन विभागाकडून देण्यात आला आहे.
वाघांचा तातडीने योग्य तो बंदोबस्त व्हावा....
बोरगाव परिसरात असलेल्या अंदाजे 5 वाघांमुळे येथील जनता चांगलीच भयभीत झाली असून त्यामुळे केव्हा कधी कोणती अनूचित घटना घडणार याचा नेम उरला नाही, त्यामुळे वेकोलीने पिंपळगांव, जुनाळ, बोरगाव, येथील घनदाट असलेल्या परिसरातील कच-याची विल्हेवाट लावून झाडी झडपी साफ करावी तसेच प्रत्येक खान परिसरात रस्त्याच्या कडेला 5 फूट पर्यंत जाळ्या लावाव्या जेणेकरून बाघ रस्त्यावर येणार नाही आणि कोणती अनुचित घटना घडणार नाही अशी मागणी बोरगाव चे सरपंच दीपक मंत्ते यांनी केली असून वन विभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा असे सुद्धा यावेळी असे बोलून दाखविले