मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा दांडगाव परिसरच्या नाल्यात एका (अंदाजे ६५) वर्षीय अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. सदरहू मृतदेह अज्ञात असल्याने परिसरात तर्क वितर्क लावले जात आहे.
तालुक्यातील दांडगाव येथील नाल्यात एका वृद्ध माहिलेचा आज दि.17 जुलै रोजी दुपारी च्या सुमारास मृतदेह आढळून आला. सदरील घटनेचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह कोणाचा? होय म्हणून गर्दी केली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला.
मारेगाव पोलीस प्रशासन वृद्ध महिलेची ओळख पटवून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करित असून या महिलेशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केले आहे.
तूर्तास मृतदेहाच्या अंगात निळ्या रंगाची साडी परिधान केली असल्याचा व मृतक महिलेचे वय अंदाजे 65 वर्षे च्या आसपास आहे,असा तपशील प्रसिद्ध केला आहे.