उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर
सावली : तालुका हा भात पिकाच्या तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यांमध्ये 90 टक्के हे शेतकरी आहे आणि शेतीवरच आपल्या कुटुंबाच्या उदारनिवार करतात परंतु मागील आठ पंधरा दिवसापासून सावली तालुक्यामध्ये सतंधार पाऊस येत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील नदी नाल्याना पुर येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेली आहे.
तसेच गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदी व नाल्याना पुर येत आहेत तर आता दुसऱ्यांदा सावली तालुक्यातील जिबगांव परीसरात पुर आल्यामुळे नदी नाल्यालगत शेतीचे मोठे नुकसान झाले असुन, शेतकरी हा चिंतेत पडला आहे. पूर्णपणे नदि नाले वाहत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून आहे शेतकऱ्यांच्या धान्य अति पावसामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उडवले असून शेतकरी वर्ग हा आर्थिक संकटात सापडलेला आहे.
सावली तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची बांधावर जाऊन पाहणी करून त्वरित पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत पुरवावी अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे वतीने करण्यात आलेली आहे.