उभ्या ट्रकला दुचाकीस्वाराची धडक, पंचमुखी हनुमान मंदिरा समोरील घटना

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर

वणी : नांदेपेरा शिवारातील पंचमुखी हनुमान मंदिरा जवळ उभ्या असलेल्या ट्रक ला वणीवरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दि. 3 जून रोजी घडली. घटनेची वार्ता परिसरात पसरताच लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

प्राप्त माहिती नुसार वनोजा देवी ते नांदेपेरा मार्गांवर पंचमुखी हनुमान मंदीर आहे. त्या मंदिरासमोर ट्रक क्र (Mh 34BG 4667) हा उभा होता, अशातच वणीवरून अनिल कृष्णाजी लांबट (अंदाजे 53) रा. दांडगाव (ता. मारेगाव) हे प्लॅटिनम कंपनीची मोटार सायकलने वणी वरून बाजार घेवून व आपले काम आटपून गावाकडे निघाले असता, नांदेपेरा शिवारातील पंचमुखी हनुमान मंदिरासमोर डाव्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला मागून अनिल लांबट याने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सदर घटना  4:15 वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील उपचारासाठी जखमीला वणी कडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.
"विशेष म्हणजे मार्डी नांदेपेरा या मार्गांवर भरधाव जड वाहतूक होत असल्याने मागील आठवड्यात वाघाडा नालाच्या जवळ मच्छिन्द्रा येथील 47 वर्षीय विवाहित तरुणाचा ट्रक च्या धडकेत दुर्दैवी अपघात झाला त्यात तो जागीच ठार झाला होता."
उभ्या ट्रकला दुचाकीस्वाराची धडक, पंचमुखी हनुमान मंदिरा समोरील घटना उभ्या ट्रकला दुचाकीस्वाराची धडक, पंचमुखी हनुमान मंदिरा समोरील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on June 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.