कुमार अमोल : सह्याद्री चौफेर
तालुक्यातील रेतीघाटावरून अवैध रेती वाहतूक अहोरात्र होत असून, शासनाचा महसूल बुडत असल्यामुळें, रेती माफियांनी एकजुट दाखवून पोलिस आणि महसूल विभागांच्या कर्मचाऱ्यांशी ‘सेटींग' केले असून दर दिवसाला मारेगाव शहरासह तालुक्यातील अवैधरित्या जवळपास २०० हायवासह ट्रॅक्टरने रेती येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महसूल विभाग आणि पोलिस विभागाच्या आशीर्वादाने तालुक्यातील रेती तस्करीचा गोरखधंदा सुरू आहे.
कोसारा, आपटी घाटावरून मारेगाव शहरासह कुंभा, मार्डी, वेगाव, इत्यादी ठिकाणी रेती येते. व स्टॉक करून असलेल्या भागातून रात्रभर ट्रॅक्टरसह हायवाच्या सहाय्याने वाळुची अवैध वाहतूक केली जातो. त्यामुळे शासनाचा महसूल तस्करांच्या घसात जात आहे. तसेच या ओव्हरलोड वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्त्यांची पूर्ण वाट लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाला दुहेरी तोटा होतो आहे. या अवैध रेती वाहतूकीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून पोलिस, महसूल आणि परीवहन विभागाच्या संयुक्त पथकाने कडक कारवाई करावी अशी अपेक्षा आहे.
जब मिल बैठे तीन यार; खाकी, राजस्व आणि रेती माफिया
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 03, 2022
Rating:
