कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
कमलाकर नक्षिणे यांचा मोठा मुलगा विशाल उर्फ अक्षय नक्षिणे (26) रा रंगनाथ नगर, वणी हा नवयुवक दि.17 मे 2022 ला घरून काही कामानिमित्त बाहेर पडला. परंतु तो घरी परतला नसल्याने दि. 18 मे रोज बुधवारला त्याचा भाऊ गौरव नक्षिणे याने वणी पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली असुन, त्याचा शोध सर्वत्र सुरू आहे.
अक्षय च्या बेपत्ता असल्याच्या सोशल सह माध्यमातून आढळल्यास 8308061927 या क्रमांकावर संपर्क किंवा वणी पोलीस स्टेशन ला काळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील रंगनाथ नगर येथील रहिवासी व कटिंगचे दुकान असेलेले गौरव कमलाकर नक्षिणे याचा मोठा भाऊ विशाल उर्फ अक्षय कमलाकर नक्षिणे हा घरून दुकानात आला व बँकेचे पासबुक दुकानात ठेवले व काही न बोलता दिनांक 17/05/2022 ला दुकानातून निघून गेला, नंतर रात्री 10 वाजताचे सुमारास गौरव हा घरी गेला असता मोठा भाऊ विशाल उर्फ अक्षय हा दिसला नाही म्हणून गौरव ने घरच्यांना विचारपूस केली. मात्र घरच्यांनी सांगितले की, तो दुकानात गेल्यापासून घरी आला नाही. त्यानंतर अक्षय च्या मित्रांना संपर्क केला. तसेच नातेवाईकांना सुद्धा फोन द्वारे संपर्क साधून विचारपूस केली परंतु त्याचा शोध कुठेच लागला नसल्याने अखेर वणी पोलीसात गौरव ने आपला भाऊ हरवल्याची तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार त्याचा वर्ण रंग निमगोरा, उंची 5.6 फूट, बांधा सळपातळ, अंगात शर्ट पांढऱ्या रंगाचे, पॅन्ट काळ्या रंगाचा, केस काळे, उजव्या हातावर उर्दू अक्षरात गोंदलेले असून कुणालाही अक्षय आढळल्यास त्वरित वणी पोलीस स्टेशन किंवा 8308061927 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
"विशेष म्हणजे ससध्या वणी परीसरात तरुण मुले व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सावर्ला येथील अजय अनिल तामगाडगे हा १८ वर्षिय युवक आठ महिन्यांपासून बेपत्ता असुन, त्याचा शोध वणी पोलीस घेत आहेत. परिसरात बेपत्ता होणे, राडा करणे, झुंड गिरी, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे."
कालपासून अक्षय नक्षिणे बेपत्ता, आढळल्यास वणी पोलिसांना कळवा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 19, 2022
Rating:
