आरटीआय कार्यकर्त्यांचा मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : रोजगार हमी योजनेच्या कामाची माहिती, माहिती अधिकार अधिनियम नुसार कायद्याद्वारे मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यामधिल घाटंजी तालुक्यातील मौजे पारवा येथे सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी ठेकेदारासह चौघांना अटक केली आहे. मौजे पारवा येथील अनिल देवराव ओचावार वय ३८ वर्षे यांचे झेरॉक्स सेंटर असून आरटीआय कार्यकर्ता म्हणून ही ते काम करीत होते. रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास त्यांना घरून बोलावून नेऊन दगाफटका करण्यात आला. सोमवारी सकाळी तलावाजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या उकीरड्यांवर मृतदेह आढळून आला.  
        
पत्नीच्या नावाने माहिती अधिकार टाकून सन २०१९-२० व २०२०-२०२१ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाची माहिती वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना माहितीची विचारणा केल्याच्या कारणावरून त्यांचा निर्गुण खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अनिल ला रात्री १२:३० वाजता च्या सुमारास दानिश शेख इसराईल वय २४ वर्षे याने घरुन बोलावून नेले होते. मिटिंगचे कारण सांगितल्याने पत्नीनेही त्याला जाण्यास होकार दिला, आणि सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेहचे आढळून आला. कंत्राटदार विजय नरसिमलु भाषणवार  (३८),जावेद मौला काटाटे (३५), दानिश शेख इसराईल वय २४ वर्ष व सुमित शंकर टिप्पणवार (२७ ) रा.मौजे पारवा यांनी आपल्या पतीवर गळा,छाती आणि पोटावरही तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरून या चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असली, तरीही त्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियास दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. तर महाराष्टातील सर्व आरटीआय कार्यकर्ते यांना तात्काळ संरक्षण द्यावे, दोषीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी संपर्क प्रमुख दारव्हा तालुका प्रेम राठोड, मुख्य प्रचार प्रमुख दारव्हा तालुका चेतन पवार, हेमंत आडे, वासुदेव राठोड, दिपक चव्हाण, किशोर आडे यांनी एका निवेदनाद्वारे रवि तुपसुंदरे नायब तहसीदार,तहसील कार्यालय दारव्हा यांच्यामार्फत ग्रहमंत्री दिलीप वळसे-पाटील मुंबई यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
आरटीआय कार्यकर्त्यांचा मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी आरटीआय कार्यकर्त्यांचा मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी Reviewed by सह्याद्री चौफेर on May 19, 2022 Rating: 5
Powered by Blogger.